PCBToday News: पिंपरी-चिंचवडमध्ये २० ठिकाणी हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा; आमदार जगतापांच्या हस्ते उद्घाटन https://pcbtoday.in/#/readNews/8780
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी खासगी सहभागातून (सीएसआर) शहरातील २० ठिकाणी २०० युनिट्स हवा प्रदूषणनियंत्रण यंत्रणा बसविणार आहे. हे सर्व युनिट मेसर्स प्रोडक्ट डिझाईन व अॅटोमेशन सेंटर या कंपनीने महापालिकेच्या पर्यावरण विभागाला मोफत दिले आहेत. तीचालविण्यासाठी महापालिका केवळ वीज उपलब्ध करून देणार आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगतापयांच्या हस्ते सोमवारी (दि. ५) पहिले युनिट बसवून हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. महापालिका हद्दीत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जेवढी लोकसंख्या तेवढी वाहने असे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळेशहरातील हवेचे प्रदूषण धोकादायक पातळीवर पोचले आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम होऊ लागले आहेत. लहान मुले व ज्येष्ठनागरिकांना फुप्फुसाचे आजार तसेच अस्थमासारख्या आजारांना बळी पडावे लागत आहे. हे आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यावर मातकरण्यासाठी वाहनांपासून होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जाणार आहे.